You are currently viewing हिशोब

हिशोब

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हिशोब*

 

आयुष्याचा हिशोब कुणा

कुणा नाही कळला

 

शेवटी सरणावरती सारा

देह जळून गेला

 

बेरीज करता करता

वजाबाकी होऊन गेली

 

गुणाकाराच्या पटीत चालताना

कधी वि-भागून गेलो

 

यशापयशाच्या चौकटीत राहून

कधीही नाही हरलो

 

त्रिज्या कुठे छेदून गेली

कधी कळलेच नाही

 

सरणावरती जाता जाता

हिशोब चुकता झाला

 

जळून गेला देह परि

राखेत शुन्य बाकी राहिला

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा