आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात महाराणा प्रतापसिंह व छ.शाहू महाराज यांची संयुक्त जयंती संपन्न-
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २६ जून २०२५ रोजी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शाहू महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. अर्जुन रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर विश्वस्त श्री.गणपत रावराणे, श्री.शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती सचिव श्री.प्रमोद रावराणे, प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार व कार्यालय अधीक्षक श्री.संजय रावराणे उपस्थित होते.
सुरुवातीला महाराणा प्रतापसिंह आणि छ.शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ.एन. व्ही. गवळी यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचा वैभव राणा हा वार्षिक अंक प्रकाशित करण्यात आला. तसेच सिद्धिविनायक पुस्तक पेढीतर्फे विद्यार्थ्यांना पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी साक्षी कातकर, अनिकेत कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्यावर तर कामिनी राऊत व कोमल मोंडकर या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर मनोगते व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. एस.एन.पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्यावर व डॉ. आर.एम. गुलदे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्य कर्तुत्वावर मनोगते व्यक्त करत आपल्या प्रभावी भाषणातून इतिहासाचे व सामाजिक समतेचे महत्त्व स्पष्ट केले. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
विश्वस्त श्री.गणपत रावराणे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली व जयंती उत्सवाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अर्जुन रावराणे यांनी आपल्या अध्यक्षही मनोगतातून विद्यार्थ्यांनी या दोन्हीही महापुरुषांचे पराक्रम व विचारातून प्रेरणा घेऊन समाजसेवा व शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याचे आवाहन केले.
संयुक्त जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेणारे भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, एनएसएस विभाग व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. ए. कारेकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आर. ए.भोसले यांनी मानले.