You are currently viewing नांदगाव-कोळंबा मंडळातर्फे उद्या गुणवंतांचा सत्कार

नांदगाव-कोळंबा मंडळातर्फे उद्या गुणवंतांचा सत्कार

नांदगाव-कोळंबा मंडळातर्फे उद्या गुणवंतांचा सत्कार.*

कणकवली

नांदगाव येथील श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळातर्फे जिल्ह्यात दहावीत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तसेच नांदगाव येथील श्री सरस्वती विद्यालयातील दहावीतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवार, २७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता नांदगाव हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला वैभववाडी येथील रावराणे कॉलेजच्या प्रा. सौ. संजीवनी पाटील, नाट्य-सिने कलाकार गणेश रेवडेकर तसेच नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. कोळंबा मंडळातर्फे जिल्ह्यातील गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाची परंपरा खूप वर्षांची आहे. जिल्हयात कोळंबा मंडळाचा सन्मान मानाचा समजला जातो. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आदींनी उपस्थित राहवे, असे आवाहन देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा