सावंतवाडी :
पाडलोस गाव ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रणित गावडे यांची तर सचिवपदी अमय गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत सर्वानुमते समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी काशिनाथ आत्माराम आंबेकर (हवालदारवाडी), खजिनदार लक्ष्मण प्रशांत माधव (बामणवाडी), सहसचिव रोहित सुरत गावडे (भाकरवाडी), सहखजिनदार सुरज दत्तराम गावडे (मधलीवाडी), अंतर्गत हिशोब तपासणी महेश रामा पाडलोसकर (शीतलवाडी), प्रसार माध्यमपदी विश्वनाथ अंकुश नाईक (केणी वाडा) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, पाडलोस विकास सहकारी सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर परब, गाव ग्रुपचे माजी अध्यक्ष विश्राम गावडे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.