हिर्लोक येथे संगीत कार्यशाळा व मार्गदर्शन शिबीर संपन्न
ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संगीत क्षेत्रात मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेली संगीत कार्यशाळा व मार्गदर्शन शिबीर कौतुकास्पद आहे. सर्व सामान्य कुटुंबातील असून देखील पालक आपल्या मुलांच्या अंगीभूत कलांना वाव देत असतात. त्यामुळे कोकणातील सर्व कला जोपासल्या जात आहे. हि संगीत कार्यशाळा नवोदित कलाकारांच्या भविष्यातील वाटचालीस प्रेरणादायी ठरेल.त्यामुळे संगीत क्षेत्रात नाव उज्ज्वल करण्यासाठी कलाकारांनी अथक मेहनत घ्यावी, येत्या काळात भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांनी ८ दिवसांचे संगीत प्रशिक्षण शिबीर आयोजित करावे त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य आपण करणार असल्याचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
संगीत रत्न भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुसकर संचलित नमोशारदा संगीत क्लासेस आणि ग्रुप ग्रामपंचायत हिर्लोक किनळोस यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत कार्यशाळा व मार्गदर्शन शिबीर हिर्लोक लिंगेश्वर मंदिर येथे आज आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन जि. प. सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत ,उपसभापती जयभारत पालव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नवोदित कलाकारांना भजन सम्राट भालचंद्र केळुसकर ,अँड दिलीप ठाकूर, डॉ. दादा परब, संजय वेतूरेकर, प्रताप कानडे, महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे हिर्लोक पंचक्रोशीतील संगीत क्षेत्रातील सुमारे १५० कलाकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे,संतोष परब, मोहन परब, विजय परब, सुभाष परब, राघोबा परब, रामचंद्र परब माधव परब, विश्राम परब, आबू सावंत, शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत, कानू शेळके आदी उपस्थित होते.