You are currently viewing सिंधुदुर्गची कन्या गार्गी राजन रेडकर हीची कतार येथे “फुटबॉल फिफा वर्ल्डकप २०२२” करिता निवड

सिंधुदुर्गची कन्या गार्गी राजन रेडकर हीची कतार येथे “फुटबॉल फिफा वर्ल्डकप २०२२” करिता निवड

वेंगुर्ला :

कपोल कॉलेज, मुंबई मधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करीत असताना अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्गची कन्या गार्गी राजन रेडकर हिची कतार देशात होवू घातलेल्या “फुटबॉल फिफा वर्ल्डकप २०२२” याकरिता मुंबईतून निवड झाली आहे. कुमारी गार्गी ही दोन महिन्याकरिता कतार येथे होणाऱ्या “फुटबॉल फिफा वर्ल्डकप २०२२” करिता रवाना झाली आहे. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभाग सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स चे सल्लागार संपादक, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे उपाध्यक्ष व रेडी गावचे सुपुत्र राजन रेडकर यांची गार्गी ही कन्या आहे.

दरम्यान गार्गी ने या अभ्यासक्रम दौऱ्याकरिता निवड व्हावी याकरिता प्रत्यक्ष मुलाखती देवून यात हे यश मिळविले आहे. याकरिता गार्गीने भरपूर मेहनत घेतली होती असे तीचे वडील राजन रेडकर यांनी सांगितले. गार्गीला मिळालेल्या या यशाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे रेडकर कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + eleven =