You are currently viewing जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया – जिल्हाध्यक्ष अमित सामंत

जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया – जिल्हाध्यक्ष अमित सामंत

जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया – जिल्हाध्यक्ष अमित सामंत

प्रामाणिक व निष्ठावान म्हणत वाढदिनी सर्वपक्षियांकडून शुभेच्छा…

कुडाळ

निवडणुकां पुरते ठीक पण त्या झाल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षियांनी एकत्र येऊया आणि जिल्ह्याचा विकास करूया, असे आवाहन शरद पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज आपल्या वाढदिनी केले. दरम्यान मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथीत अनेक समस्या आणि ऑफर आल्या परंतु एका पक्षाशी आणि नेत्याशी प्रामाणिक राहिलो. भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे बळ मला मिळो, असे त्यांनी सांगितले. श्री. सामंत यांचा वाढदिवस आज येथील मराठा समाज सभागृहात पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ.नम्रता कुबल, यूवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँक माजी संचालक प्रसाद रेगे, आत्माराम ओटवणेकर, संदेश पारकर, नगरसेवक मंदार शिरसाट, बाळ कनयाळकर, बॅ.नाथ पै.संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, कुडाळ व्यापारी संघटना माजी अध्यक्ष श्रीराम शिरसाट, शिवाजी घोगळे, गणेश भोगटे, नझीर शेख, संजय लिंगवत, पुंडलिक दळवी, नकुल पार्सेकर, कृष्णा धुरी, विद्याप्रसाद बांदेकर, श्रीराज शहा, सचिन पाटकर, हीदायतुल्ला खान, नईम मेमन, तौफिस आगा, विशाल जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नाईक म्हणाले की, अमित सामंत यांनी विद्यार्थी दशेपासून काम केले आहे. आज सत्तेत ते नाहीत तरीसुद्धा त्यांचे अनेकांशी चांगले संबंध आहेत. कोरोनामध्ये त्यांनी म्हाडाचे हाॅस्पिटल सुद्धा सुरू केले होते. आज सर्व पक्षियांना एकत्र आणण्याचे काम श्री. सामंत करत असतात. ईर्षाद शेख म्हणाले की, अमित सामंत आमदार व्हावे, मंत्री व्हावेत, अशा आजच्या दिनी शुभेच्छा देतो. विवेक ताम्हणकर म्हणाले की, शेवटच्या घटकांपर्यंत लक्ष असणारे अमित सामंत हे व्यक्तिमत्त्व आहे. माणुस कोण आहे हे पाहत न बसता त्याला काय गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे व्यक्ती म्हणजे अमित सामंत होय. त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल. प्रसाद रेगे म्हणाले की, एक स्पष्ट वक्ता, दुरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व म्हणजे अमित सामंत होय. यावेळी असलेल्या अन्य मान्यवरांनी अमित सामंत यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा