You are currently viewing *शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता ! किसान रेल्वेद्वारे 49 टनाहून अधिक कृषिमाल वाहतूक ; देशातील 18 मार्गावरुन सेवा.*

*शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता ! किसान रेल्वेद्वारे 49 टनाहून अधिक कृषिमाल वाहतूक ; देशातील 18 मार्गावरुन सेवा.*

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार भारतीय रेल्वेतर्फे दूध, मांस, मासे यांच्यासह इतर नाशवंत पदार्थ आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिली किसान रेल्वे ७ ऑगस्ट २०२० ला नाशिकच्या देवळालीहून दानापूरपर्यंत धावली. आता ही रेल्वे सांगोला ते मुझफ्फरपूर अशी धावते आहे. गेल्या आठवड्यापर्यंत १५७ किसान रेलच्या माध्यमातून ४९ हजार टनांहून अधिक कृषिमालाची वाहतूक करण्यात आली आहे.

कृषि क्षेत्राचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट

देशातील १८ मार्गांवरून ही किसान रेल्वे सुरू असून, त्यातील ११ मार्ग राज्यातील आहेत.

नाशिक जिल्ह्यातील नगरसूलहून नवीन गुवाहाटी, चितपूर, नवीन जलपैगुडी, नौगाचिया, फतुहा, भैहता, मालदा अशा किसान रेल्वे धावल्या आहेत. बहुवस्तू, बहुमालवाहू, उपभोक्ता, बहुलोडिंग आणि अनलोडिंग वाहतूक किसान रेल सेवेमुळे होत आहे. उत्पादन केंद्रे आणि बाजारपेठ यांचा मेळ घालून उपभोक्त्यापर्यंत नाशवंत उत्पादने शक्य तितक्या कमी कालावधीत पोचविता यावीत आणि कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविता यावे, असे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करून किसान रेल सेवा सुरू करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी वेळापत्रक निश्‍चित

 

किसान रेल सेवा सुरू करण्यासाठी कृषी मंत्रालय, राज्य सरकार आणि स्थानिक संस्था यांच्यासह रेल्वेच्या विविध भागधारकांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे किसान रेल्वेसेवा सुरू झाली आहे. या क्षेत्रातील सहभागीतांकडून आलेल्या मागण्या, त्यांच्या आवश्यकता यांच्याविषयी आलेले अभिप्राय यांच्या आधारे भारतीय रेल्वेने किसान रेल सेवा सुरू केली आहे. किसान रेलगाड्यांसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असून, त्यानुसार त्यांचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरील इतर गाड्यांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा