You are currently viewing कंगना राणावत दिसणार माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत

कंगना राणावत दिसणार माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत

राजकारणाच्या पटलावर झालेल्या गोष्टींवर येणाऱ्या एका आगामी चित्रपटात कंगना राणावत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसून येणार आहे. मात्र हा चित्रपट इंदिरा गांधींचा बायोपिक नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे आणि चित्रपटसृष्टीतले अनेक तारेतारका या प्रोजेक्टचा भाग असल्याचेही तिने सांगितले आहे.

कंगना राणावतने म्हटले आहे, ‘हो, आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत आणि चित्रपटाची संहिता शेवटच्या टप्प्यात आहे. हा इंदिरा गांधींचा चरित्रपट नाही, तर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित हा एक भव्य चित्रपट आहे. हा एक राजकीय नाट्यपट आहे ज्यामुळे माझ्या पिढीला वर्तमान भारताचे सामाजिक-राजकीय पटल समजून घेण्यास मदत होईल.’ कंगनाने पुढे म्हटले, ‘अनेक प्रसिद्ध कलाकार या चित्रपटाचा भाग असणार आहेत आणि भारतीय राजकारणातील सर्वात प्रसिद्ध नेत्याची भूमिका साकारायला मी उत्सुक आहे.’

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − fourteen =