You are currently viewing आजगाव येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन

आजगाव येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन

*क्रीडाप्रेमी व क्रीडा रसिकांनी शूटिंग बाॅल स्पर्धेचे लाभ घ्यावा – सागर नाणोसकर*

 

*सावंतवाडी :*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ज्ञदिनांक 25 डिसेंबर रोजी आजगाव येथे भव्य शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व युवासेना आयोजित या भव्य शूटिंग बॉल स्पर्धेसाठी हॉटेल फिश टेल, शिरोडा व कोकण फार्मास्युटिकल्स (राज कोकम), नाणोस हे मुख्य प्रायोजक आहेत.

युवासेनेचे उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर आणि आजगाव येथील विधीज्ञ ॲड. स्वप्नील आजगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देव आदिनाथ पटांगण, आजगाव येथे भव्य शूटिंग बॉल स्पर्धा होणार आहेत. तरी क्रीडाप्रेमी व क्रीडा रसिकांनी शूटिंग बॉल स्पर्धेचे लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर व तमाम युवासेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा