मालवण मधील गाबीत समाज बांधवांशीची 21 जुन रोजी बैठक – विष्णू मोंडकर सदस्य महाराष्ट्र राज्य मत्स्यधोरण समिती.
मालवण
महायुती सरकार मच्छिमार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अनेक योजना राबवित आहेत अनेक योजना मच्छिमार समाजाला प्राप्त होत असताना गाबीत समाजाने ही आपल्या समाज बांधवांसाठी शासकीय स्तरावर विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी गाबीत समाज समस्या निवारण मंच स्थापना करून त्या माध्यमातून गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे यांसाठी मंत्रालय स्तरावर मिटिंग झाली आहे यांची माहिती समाज बांधवा पर्यंत माहिती देण्याचे कार्य सुरु आहे. यासाठी गाबीत समाज समस्या निवारण मंचाचे अध्यक्ष सुनिल मोहन जोशी हे प्रत्यक्ष मालवण येथे उपस्थित राहून समाज बांधवांशी सवांद साधला जाणार आहे त्यांच्या सोबत सखाराम मालाडकर (मालवण), अरविंद मालाडकर (रत्नागिरी )तसेच मंच सदस्य हे सहभागी होणार आहेत. समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मंच प्रयत्नशील आहे
मालवण मध्ये महामंडळ बाबत माहिती तसेच समाजातील बांधवांना व्यवसाय उभारणीसाठी अर्थ सहाय्य देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शिबिराची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे.हा दौरा 21 जुन 2025 रोजी सकाळी मालवण येथे विष्णू मोंडकर हॉटेल श्री महाराज, मालवण पेट्रोलपंप नजीक या ठिकाणी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व समाज बांधवानी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन विष्णू मोंडकर सदस्य महाराष्ट्र राज्य मत्स्यधोरण समिती तसेच संयोजक गाबीत समाज समस्या मंच यांनी केले आहे.