You are currently viewing नांदगावातील दहावी व बारावी परिक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आम.नितेश राणेंनी केला सत्कार

नांदगावातील दहावी व बारावी परिक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आम.नितेश राणेंनी केला सत्कार

नांदगाव

नांदगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने १० वी व १२ वी परिक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत आज नांदगाव येथे करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये (१२ वी) युसरा रफीक नावलेकर, श्रीधर चंद्रकांत मोरये, साईल संजय मोरये (१०) सुरैय्या इकबाल बटवाले, श्रेया मंगेश मोरये, सादीया रफीक बोबडे यांचा समावेश आहे.

नांदगाव येथील सरपंच आफ्रोजा नावलेकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, उपसरपंच निरज मोरये, यासिन नावलेकर, इकबाल बटवाले, जाफर कुणकेरकर, भाजपचे युवक तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, असलदे ग्रा. पं. सदस्य दिनेश तावडे आदी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार नितेश राणेंनी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा