You are currently viewing वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील  शहरी व ग्रामीण भागातील ७० वर्ष व त्यावरील नागरीकांनी आयुष्मान वय वंदना योजनेचे कार्ड काढून केंद्र सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

  आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येत आहे़, योजन अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी इतर लाभार्थी कुटूंबांचा समावेश करण्यात येऊन त्यांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत विनामुल्य वैद्यकीय लाभ प्रदान करण्यात येत आहे.

भारत सरकारने ७० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजने अंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला असुन दिनांक १ एप्रिल २०२५ पासून राज्यात त्याबाबतची अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

आयुष्मान भारत वय वंदना योजने अंतर्गत फायदा:- एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत समाविष्ट जेष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदना योजनेचे स्वतंत्र आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. एकत्रित योजनेच्या प्रतिवर्ष प्रतिकुटूंब ५ लाखा पर्यंतच्या मोफत उपचारा बरोबरच आयुष्मान वय वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त ५ लाख रुपयांचे टॉप-अप प्रदान करण्यात येणार असून योजने अंतर्गत अंगिकृत रुग्णालया मधुन १ हजार ३५६ उपचार पध्दतीवर मोफत उपचार अनुज्ञेय आहेत.

आयुष्मान भारत वय वंदना कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः- आधार कार्डद्वारे लाभाथ्यांची ई-केवायसी केली जाते. आयुष्मान भारत वय वंदना कार्ड काढण्यासाठी सर्व उपजिल्हा रुग्णालये, सर्व ग्रामीण रुग्णालये व महिला व बाल रुग्णालय येथे शिबिराचे आयोजन (सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत) करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा