You are currently viewing पडेल येथे “मोदी @११” कार्यशाळा उत्साहात संपन्न

पडेल येथे “मोदी @११” कार्यशाळा उत्साहात संपन्न

देवगड / पडेल :

भारतीय जनता पार्टी, पडेल मंडल यांच्यावतीने नुकतीच मोदी @११ मंडळ कार्यशाळा उत्साहात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ११ वर्षांमध्ये केलेल्या जनहितार्थ कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती रवींद्र पाळेकर यांनी करताना कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.

या कार्यशाळेचे मुख्य वक्ते म्हणून भाजपाचे कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजना आणि त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीवर सखोल माहिती दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता, महिला आरक्षण, महिलांसाठी असलेल्या विविध योजनायांची माहिती दिली.विश्वनाथ पडेलकर यांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेतली.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी उपस्थितमान्यवरच्या हस्ते माहिती पत्रकाचे अनावरण देखील करण्यात आले, ज्यामुळे मोदी सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे झाले.

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी योजनांबद्दल माहिती दिली. तसेच योजनाचा प्रत्यक्ष लाभ झालेल्या लाभार्थी यांनी माहिती दिली व मोदी सरकारचे आभार व्यक्त केले.

या कार्यशाळेमुळे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आणि विकासाच्या संकल्पाला आणखी बळकटी मिळाली.

सदर कार्यशाळेस माजी आमदार अजित गोगटे,मंडल अध्यक्ष महेश उर्फ़ बंड्या नारकर, रवींद्र पाळेकर, डॉ. अमोल तेली, आरिफ बगदादी, महिला मोर्चा अध्यक्ष संजना आळवे, रवींद्र तिर्लॉटकर, अंकुश ठुकरूल, तसेच सर्व जिल्हा, तालुका कार्यकारणी सदस्य, सर्व मोर्चाचे पदाधिकारी, सर्व शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा