राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत माळगाव हायस्कूलचे सुयश.
यशश्री गुरुनाथ ताम्हणकर सिल्व्हर कॅटेगरी प्रमाणपत्र मानकरी
मालवण
महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगाव या शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने सिल्व्हर कॅटेगरी प्रमाणपत्र प्राप्त यादीत स्थान मिळविले. जिल्ह्यातील निवडक शाळांमधील २३ विद्यार्थी या परीक्षेत पात्रताधारक ठरले. या यशाबद्दल तिचे माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्री. संजय खोत, उपाध्यक्ष श्री. अरुण भोगले, सेक्रेटरी श्री. हेमंत हडकर, मुख्याध्यापक श्री. तुकाराम गिरी, माजी मुख्याध्यापक श्री. उदय जोशी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
गणित विषयाचा पाया भक्कम करणारी आणि विशेष दर्जा असलेली अशी ही परीक्षा असून गणित प्राविण्य परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र होतात. गणित प्राविण्य परीक्षेत कुमारी यशश्री गुरुनाथ ताम्हणकर ही सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरली होती. तसेच याच शाळेतील कु. भार्गवी नारायण कदम ही विद्यार्थिनी सुद्धा प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरली होती.
या विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक श्री. सागर मिसाळ, श्रीम. निकिता माळगावकर, श्री. बेनके, श्रीम. जाधव आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे माळगाव ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे.