You are currently viewing तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडी भागात घुसले

तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडी भागात घुसले

रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे नदीने ओलांडले पात्र

बांदा

रात्रभर संततधारपणे कोसळत असलेल्या पावसाने तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील आळवाडी भागात शिरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून सरपंच अक्रम खान, तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ पुरस्थितीची पाहणी करत व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

शहरातील आळवाडी -शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील अनेक दुकानात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याचा वेग वाढत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − one =