*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रेम इतकं ..ही करू नकोस ..!!*
अंतमृख होवून तू
स्वतःची ओळख करून घे!
माझं राहू दे गं
तू तुझ्या जीवनाचा वेध घे..!
प्रेम इतकं ही करू नकोस की
माझ्यातला आशिक मरून जाईल
सवय नाही गं!इतक्या प्रेमाची
ही जानचं तुझ्यावर कुर्बान होईल ..!
चंद्रबिंब मुखाचं …पाण्यात
असं काही थिरकलं
तुझ्या भालावरच्या बिंदीचं
क्षणभर तुझं ..रूप वाटून गेलं
मरेपर्यंत वाट पाहिन गं..
प्रिये ..मी तुझी
हे आयुष्य कमी पडेल
हीच खंत माझी ..!
माझं लिहीलेलं हे पत्र ..गेल्यावर
प्रिये.!उघड तू ..जरा सांभाळून
त्यात गुंतलेलं.. काळीज
खाली पडेल गं..चुकून ..
बाबा ठाकूर