You are currently viewing कवी गझलकार गीतकार समीक्षक विजो (विजय जोशी) डोंबिवली यांच्या ‘बाया’ या मराठी कवितेचा ५६ भाषांमध्ये अनुवादाचा जागतिक विक्रम

कवी गझलकार गीतकार समीक्षक विजो (विजय जोशी) डोंबिवली यांच्या ‘बाया’ या मराठी कवितेचा ५६ भाषांमध्ये अनुवादाचा जागतिक विक्रम

*कवी गझलकार गीतकार समीक्षक विजो (विजय जोशी) डोंबिवली यांच्या ‘बाया’ या मराठी कवितेचा ५६ भाषांमध्ये अनुवादाचा जागतिक विक्रम*

 

*वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया कडून झाला सत्कार*

 

डोंबिवली: कवी गझलकार गीतकार समीक्षक विजो (विजय जोशी) डोंबिवली यांच्या ‘बाया’ या मराठी कवितेचा ५६ भाषांमध्ये अनुवादाचा जागतिक विक्रम झाला आहे. रविवार दि.१५ जून २०२५ रोजी डोंबिवली येथे वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया चे प्रतिनिधी चीफ एडिटर सुषमा नार्वेकर आणि मार्केटिंग हेड संजय नार्वेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन कवी विजो यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अनुवादकांनाही सन्मानित करण्यात आले.

या ५६ अनुवादित भाषांमध्ये ३४ बोलीभाषा, १५ प्रादेशिक भाषा, ७ जागतिक भाषा आहेत. (यामध्ये मोडी आणि ब्राम्ही लिपी यांचाही समावेश आहे हेही विशेष). अजूनही इतर भाषांमध्ये देखील सदर कवितेचे अनुवाद येत आहेत हे उल्लेखनीय.

मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित झाली असतानाच एखाद्या मराठी कवितेला एवढ्या मोठ्या संख्येने अनुवादाच्या सहाय्याने जागतिक पटलावर पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम झाले आहे, याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा