You are currently viewing श्रीगुरूंचे स्मरण

श्रीगुरूंचे स्मरण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्री.अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगुरूपौर्णिमा- त्यानिमित्ताने श्रीगुरुचरणी काव्यपुष्प..*

——————————————

*श्रीगुरूंचे स्मरण*

———————————-

श्रीगुरूंना नमन । पुजावे चरण ।

नित्य स्मरण । रोज रोज ।।

 

मार्गदर्शी गुरू । कृपा त्यांची होई |

मन स्थिर होई । गुरु कृपे ।।

 

एक भगवंता । भजावे भजावे ।

चिंतन करावे ।श्रीगुरूंचे ।।

 

माय बाप दोघे ।गुरूच असती ।

हेच घडविती । लेकराला ।।

 

व्यवहारी येती । अनुभव किती ।

सारे शिकवती । जगण्यास ।।

 

जो भेटला त्याला।गुरू त्यास केला ।

मंत्र हाच दिला । श्रीगुरुंनी ।।

———————————————–

श्रीगुरूंचे स्मरण

-अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342


प्रतिक्रिया व्यक्त करा