वेंगुर्लेत सचिन वालावलकर मित्रमंडळ व नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण..
वेंगुर्ले
सचिन वालावलकर मित्रमंडळ वेंगुर्ला व नगरपरीषद यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर तसेच मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष परब, उपाध्यक्ष ॲड. मनीष सातार्डेकर, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, वेंगुर्ला नगरपरीषदेचे प्रवीण कांबळी, सागर चौधरी, कलावलचे अध्यक्ष बाळू खामकर, सचिन वालावलकर मित्र मंडळाचे सदस्य संदेश रेडकर, शैलेश केसरकर, लवू गावडे, प्रशांत सावंत, जयंत सावंत, जयेश गावडे, पिंटू कुडपकर, बाळा आरावंदेकर, किशोर घाडी, विशाल राऊत, यशवंत किनळेकर, संजय परब, राजू परब, मनी रेवणकर, देवीदास वालावलकर, सुचित परब, सागर शिरसाट, किडा प्रशिक्षक सौ. संजीवनी परब, जया चुडनाईक तसेच मंडळाचे इतर सर्व सदस्य व वेंगुर्ला नगरपरीषद इतर कर्मचारी उपस्थीत होते, यावेळी कॅम्प स्टेडियम येथे नारळ, काजु, आंबा, फणस, चिकु, कोकम, पेरु, बदाम, जांभुळ, कौटी चाफा, चाफा, अश्या विविध प्रकारच्या फळझाडांची व फुलझाडांची लागवड करण्यात आली.