You are currently viewing सावंतवाडीत ५ ते ७ फेब्रुवारीला “मत्स्य महोत्सवाचे” आयोजन – अतुल काळसेकर

सावंतवाडीत ५ ते ७ फेब्रुवारीला “मत्स्य महोत्सवाचे” आयोजन – अतुल काळसेकर

सावंतवाडी

भाजपाच्या आत्मनिर्भर अभियाना अंतर्गत सावंतवाडी पालिका आणि निलक्रांती मत्स्य सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत “मत्स्य महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा बँक संचालक तथा आत्मनिर्भर अभियानाचे जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली.

हा महोत्सव येथिल भोसले उद्यान परिसरात आयोजित करण्यात आला आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर गोड्या पाण्यातील माश्यांची ओळख आणि त्यांचे सयुक्तिक रित्या नामकरण करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे प्रदेश सचिव रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. काळसेकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, मत्स्य सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरस्कर, प्रदेश जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, राजू राऊळ,मोहिनी मडगावकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, बंटी पुरोहित,आनंद नेवगी, मनोज नाईक, निशांत तोरस्कर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा