You are currently viewing आसोलीतील तेजल गावडे हिने प्राप्त केली ‘संगीत विशारद’ ही पदवी

आसोलीतील तेजल गावडे हिने प्राप्त केली ‘संगीत विशारद’ ही पदवी

आसोलीतील तेजल गावडे हिने प्राप्त केली ‘संगीत विशारद’ ही पदवी

सावंतवाडी

आसोली गावातील फणसखोलसारख्या दुर्गम ठिकाणी राहणारी कु. तेजल रवींद्र गावडे हिने नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयतर्फे घेण्यात आलेल्या एप्रिल / मे 2025 सत्राच्या परीक्षेमधून ‘संगीत विशारद’ ही पदवी प्रथम श्रेणीतून संपादन केली आहे.

तेजल गावडे हिने तिचे ‘विशारद प्रथम’ पर्यंतचे शिक्षण राधाकृष्ण संगीत साधना विद्यालय, आजगाव येथे घेतले आहे. तसेच व ‘विशारद पूर्ण’ शिक्षणासाठी तिला नरेश विनायक नागवेकर (म्हापसा – गोवा) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या पुढील तिचे संगीत शिक्षण गोव्यात सुरू आहे. या व्यतिरिक्त तेजल सध्या सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेत आहे. कु. तेजलचे अत्यंत कठीण परिस्थितीतून अल्पवयातचं मिळविलेल्या या मानाच्या पदवीसाठी तिचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा