मालवण :
मालवण मेढा शहरातील कु. यश मिलिंद कदम याने नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत ८६ टक्के मिळवून नीट (NEET) या वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत १८२३ ऑल इंडिया रँक प्राप्त केल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण टोपीवाला हायस्कुल मालवण येथे पूर्ण केले असून त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण सांगली येथील क्लिअर कन्सेप्ट अकॅडमीत झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.