You are currently viewing आरटीओ व कणकवली पोलिसांची धडक कारवाई

आरटीओ व कणकवली पोलिसांची धडक कारवाई

आरटीओ व कणकवली पोलिसांची धडक कारवाई

उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

कणकवली :

शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर आरटीओ व कणकवली पोलिसांनी शनिवारी सकाळी कारवाई केली. त्यामुळे संबंधित चालकांचे धाबे दणाणले होते.

पालकमंत्री नितेश राणे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे शहर आढावा बैठक घेतली होती. यात मंत्री राणे यांनी उड्डाणपुलाखाली जागेतील वाहने तात्काळ हटविण्याचे आदेश आरटीओ नंदकिशोर काळे यांना दिले होते. त्यानुसार आरटीओ व कणकवली पोलिसांनी संयुक्तपणे शनिवारी कारवाई केली. संबंधित वाहन चालकांनी उड्डाणपुलाखाली पार्क केलेली वाहने स्वत:हून हलवली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती जगताप व आरटोओचे सहाय्यक मोटार निरीक्षक धनंजय हिले, पराग मातोंडकर, प्रितम पवार, वैभव राणे, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, पोलीस नाईक रुपेश गुरव आदींनी केली.

उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चालकांना वाहने तात्काळ हटविण्याच्या सूचना आरटीओच्या अधिकाऱ्यांनी केल्या. विशेष म्हणजे गेली कित्येक वर्षे उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. आरटीओ व पोलिसांनी संबंधित वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

चालकाची नामी शक्कल

उड्डाणपुलाखाली पार्किंग केलेली वाहने चोरीस जाण्याचे प्रकार घडले आहे. अलीकडेच पार्क केले डंपर चोरीस गेले होते. त्यामुळे एक डंपरचालकाने आपले वाहन चोरीस जाऊ नये म्हणून डंपरचे चाक काढून वाहन पार्क केले होते. हा प्रकार आरटीओ व पोलिसांनी केलेल्या कारवाईच्यावेळी उघड झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा