You are currently viewing राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मालवणातील अपंग व्यक्तीस व्हीलचेअर प्रदान

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मालवणातील अपंग व्यक्तीस व्हीलचेअर प्रदान

मालवण :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील आडवली येथील एका अपंग व्यक्तीस मनसेच्या वतीने व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. आडवली येथील ४५ वर्षीय कुमारी रूपा लाड या ६५% शारीरिक अपंगत्वामुळे चालण्यास असमर्थ आहेत. त्या आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहतात. चालता येत नसल्याने त्यांना उचलून आधार देत दिनक्रम करावा लागत होता. आई-वडील वृद्ध असल्याने आणि घरी अन्य कोणी व्यक्ती नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडे व्हीलचेअरची मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पदाधिकाऱ्यांनी रूपा लाड यांच्या घरी जाऊन त्यांना ही व्हीलचेअर प्रदान केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर आणि तालुकाध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते. या मदतीबद्दल लाड कुटुंबीयांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा