You are currently viewing वाढत्या अपघाती मृत्यूची जबाबदारी सरकार घेऊन उपाययोजना करणार का?

वाढत्या अपघाती मृत्यूची जबाबदारी सरकार घेऊन उपाययोजना करणार का?

 

माणूस जन्माला येतो, त्याला मुत्यू अटळ आहे असे म्हटले जाते. किंबहुना जन्मला आला त्याला एक दिवस हे जग सोडून जावे लागणार आहे. यांची प्रत्येकाला जाणीव आहे. हा विचार आताच मनात का आला? असे समस्त वाचकांच्या मनात येईल. जो सोमवारी रेल्वे अपघात झाला त्यात निष्पाप प्रवाशांना जीव गमावला या बातमीची शाई वाळते न वाळते तोपर्यंत अहमदाबाद लंडन विमान कोसळून २६५ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. अलिकडे तर प्रत्येक दिवशी किती तरी लोक कुणाच्या चुकीचे शिकार बनतात. मन सुन्न करणाऱ्या घटना घडल्या म्हणून दुःख व्यक्त करतो. काही दिवसांनी दुःख विसरून जातो. असा आपल्या प्रत्येकाचा प्रवास सध्या सुरू आहे. मात्र ज्यांच्या कुटुंबातील घटना घडली त्या सदस्यांना अशा प्रसंगातून जाताना काय यातना सहन कराव्या लागतं आहेत. यांची कल्पना करवत नाही. दरम्यान अपघातामध्ये कित्येक कुटुंबात कमावता व्यक्ती गेल्यानंतर त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते ते त्या कुटुंबाशिवाय दुसऱ्याला सांगता येणार नाही. त्या व्यक्तीच्या जाण्याने शेवटी आथिर्क विवंचनेला सामोरे जात असताना आजच्या परिस्थितीचा सामना करणे डोईजड होऊन जाते आहे. या अपघात मालिका रोखण्यासाठी प्रशासनाकडून काही उपाय योजना करण्यात येत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघाती मृत्यू होत आहेत. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. वाढते विमान अपघात हे त्यांचे द्योतक आहे. एका ठिकाणाहून आलेलं विमान जुजबी देखभाल दुरुस्ती करून दुसऱ्या प्रवासाला उडान करण्याची आजही प्रथा आहे. हा कित्येक दिवसांच्या प्रवासाची त्रिसूत्री असून घटना घडल्यानंतर पक्षी आडवा आला आणि विमान घटना घडली म्हणून सांगण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. नेहमी प्रमाणे घटना घडून उच्चस्तरीय समिती नियुक्त अहवाल येईल आणि सोपस्कार पार पाडले जातील. यातून ठोस उपाययोजना करून पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून पुढे कोणत्या योजना राबवल्या जाणार? अथवा कोणत्याप्रकारे प्रयत्न करून यावर उपाय करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना देऊन संबंधितांकरवी अंमलबजावणी करणार असे आजवर झाले नसल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. अलिकडे काही घटना या मानवी चुकांमुळे होताना दिसत आहेत. त्यामुळे माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पणाला लागला असताना त्यांचा प्रवास जीवघेणा ठरतं आहे. आलेल्या वर्तमान प्रसंगातून आपण काही शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत का? हाच कळीचा मुद्दा ठरू पाहतो आहे. शासन स्तरावर मदतनिधी पाच लाख रुपये देऊन लाख मोलाच्या जीवाचे मूल्य ठरते आहे. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे एक दिवस प्रत्येकाला हे जग सोडून जावे लागणार आहे. हे सर्वश्रुत आहे पण त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंब कुणाच्या चुकीमुळे आयुष्यभरासाठी दुखी होवून जगणार असेल तर अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना करण्याची आवश्यकता वाढत्या प्रकारामुळे निर्माण झाली आहे. त्याहीपेक्षा सत्तेवर असलेल्या सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत. मुत्यु अटळ असला तरी त्याला अभय देण्याचा प्रयत्न केला जावा अशी सर्वसाधारण लोकांची मागणी आहे.

 

प्रमोद कांदळगावकर ( भांडुपगाव)

Mb.: 99692 52991

प्रतिक्रिया व्यक्त करा