You are currently viewing तुळस येथे १५ रोजी रक्तदान शिबीर.

तुळस येथे १५ रोजी रक्तदान शिबीर.

तुळस येथे १५ रोजी रक्तदान शिबीर.

*वेंगुर्ले

‘इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी,’ अशा ब्रीदवाक्याने जनमानसात परिचित असलेल्या वैताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्यातर्फे आणि वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ जून रोजी सकाळी ९ वाजता तुळस येथील श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय (तुळस देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई बहुद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांचे सलग तिसावे रक्तदान शिबीर असून रक्तपेढी ओरोस यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. रक्तदान हे कोणाचा तरी जीवन वाचविण्याचे कार्य आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हयात रक्ताचा तुटवडा असून त्यामुळे या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे आणि समाजासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दीपेश परब यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क-महेश राऊळ ९५०५९३३९१२.

प्रतिक्रिया व्यक्त करा