You are currently viewing झाडे लावा…

झाडे लावा…

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झाडे लावा…*

 

नको नुसता नारा,झाडे लावा,झाडे जगवा .

पर्यावरण दिन कसा साजरा करावा?

हिरवा शालू वसुंधरेला नेसवावा.

त्यातील एक धागा स्वतःही असावा,

हृदयी धरा हा बोध नवा.

 

‘ग्लोबल वार्मिंग’ हा इशारा समजावा,

निसर्गचक्रासाठी एक तरी झाड लावा,

मरेपर्यंत लागतो श्वास घ्यावा,

झाडांमुळेच मिळते स्वच्छ हवा,

याचा सदैव विचार असावा.

 

जो शेतकरी सर्वांना देतो अन्नाचा घास,

त्यालाच मिळत नाही अन्न सुग्रास,

तो दुष्काळाने घेतो गळ्याला फास,

बांधकामाने झाडे घेतात शेवटचा श्वास,

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ हेच विचार खास.

 

औषधे ,फळे , फुले,भाजीपाला हवा,

पाखरे ,बिचारी कोठे घेतील विसावा?

याचा साकल्याने विचार करावा,

पर्यावरण दिन अमलात आणायला हवा.

 

मानवाची निसर्गापुढे जात नाही मजल,

मे महिन्यातच धरती झाली सजल.

ऋतुत होऊ लागलेत बदल,

झाडांशी गट्टी केली तर प्राणीमात्र जगलं .

आणि आपलं योगदान होईल सफल.

 

*प्रतिभा फणसळकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा