You are currently viewing मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत – प्रा. जगदीश संसारे

मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत – प्रा. जगदीश संसारे

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

२७ फेब्रुवारी २०२४ रोजी अंधेरी येथील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी बोलताना सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. जगदीश संसारे म्हणाले,” मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. अधिकाधिक व्यवहार आपल्या मातृभाषेत करायला हवेत.” मराठी भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवताना संसारे यांनी अनेक दाखले दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र चौधरी यांनी बहिणाबाई यांची कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य आपल्या भाषणात म्हणाले,” आपण सर्वांनी मिळून मराठी भाषेचा गोडवा टिकवून ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आपली इतकी सुंदर भाषा कालौघात नष्ट होईल. या मंगल प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुजाता गवस यांनी क्रांतीचा जयजयकार हे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच मराठी भाषा प्रेमी विद्यार्थी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल अदिती गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. ढगे यांनी सूत्रसंचालन केले तर सहाय्यक ग्रंथपाल संजय जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 3 =