You are currently viewing मळगावच्या विकासासाठी भरघोस निधी देणार

मळगावच्या विकासासाठी भरघोस निधी देणार

माजी खासदार निलेश राणे यांची ग्वाही

सर्व विजयी उमेदवारांसह ग्रामस्थांचे केले अभिनंदन

सावंतवाडी
शिवसेनेच्या ताब्यात असलेली मळगाव ग्रामपंचायत सेनेच्या घशात हात घालून तुम्ही हिसकावून घेतली आहे. त्यामुळे तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. जनतेची सेवा करण्याचे हे कार्य असेच सुरू ठेवा व आगामी निवडणुकांमध्येही विजयाची ही परंपरा अशीच कायम राहू द्या. तुम्ही या निवडणुकीत लोकांना जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला सर्व निधी देण्यासाठी आम्ही बांधील आहोत, अशी ग्वाही भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिली.

मळगाव ग्रामपंचायतमधील विजयानंतर विजयी उमेदवारांसह भाजप पदाधिकारी व ग्रामस्थांची भेट घेत निलेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब, महिला तालुकाध्यक्षा गीता परब, माजी सभापती राजू परब, बंटी पुरोहित, माजी सरपंच तेजपाल सावळ, निलेश कुडव, गणेशप्रसाद पेडणेकर, चंद्रकांत जाधव, शक्ती केंद्र प्रमुख निळकंठ बुगडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + sixteen =