You are currently viewing सर्वोदय नगर येथील सांडपाण्याचे नियोजन न झाल्यास 26 जानेवारी बेमुदत उपोषण – माजी आरोग्य सभापती ॲड.  परिमल नाईक

सर्वोदय नगर येथील सांडपाण्याचे नियोजन न झाल्यास 26 जानेवारी बेमुदत उपोषण – माजी आरोग्य सभापती ॲड.  परिमल नाईक

सर्वोदय नगर येथील सांडपाण्याचे नियोजन न झाल्यास 26 जानेवारी बेमुदत उपोषण – माजी आरोग्य सभापती ॲड.  परिमल नाईक

सावंतवाडी

सावंतवाडी सर्वोदयनगर येथे भर वस्तीत चुकीच्या नियोजनामुळे व काही बेकायदेशीर रित्या केलेल्या कृत्यामुळे गटारातील सांडपाणी साचले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. नगरपरिषदेने या परिसरात अलीकडे फवारणी सुद्धा केलेली नाही. या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून माजी सभापती ॲड. परिमल नाईक यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी परिस्थिती फारच गंभीर स्वरूपाची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे व परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मुख्याधिकारी व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे, परंतु त्यावर सोयीस्कर रित्या अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

येत्या पंधरा दिवसात याबाबत कारवाई करावी अन्यथा 26 जानेवारी रोजी नगरपरिषदे समोर सर्व स्थानिक नागरिकांसमवेत बेमुदत उपोषण करावे लागेल असा इशारा माजी आरोग्य सभापती ॲड. परीमल नाईक यांनी नगरपरिषदेला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 13 =