मांगेली-फणसवाडी येथे अस्वलाने हल्ला केल्याने विष्णू लाडू गवस गंभीर जखमी
दोडामार्ग
तालुक्यातील मांगेली-फणसवाडी येथे अस्वलाने हल्ला केल्याने विष्णू लाडू गवस हे गंभीर जखमी झाले आहेत.
विष्णू गवस हे वटपौर्णिमेनिमित्त फणस काढण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.