*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वटसावित्री*
शालु हिरवा नेसुन
सजल्या त गं मैत्रिणी
जावु वड पुजण्याला
मागु कुंकवाचा धनी
नथ नाकात सजली
गळा हार तनमणी
जमल्यात साऱ्याजणी
आया बाया सुवासिनी
सात धाग्याचे गुंफण
बांधु वटवृक्षाला
दीर्घ आयुष्य लाभु दे
माझ्या हळदी कुंकवाला
म्हणे वटवृक्ष फिरुनी
नको घालु सात दोरे
कुणालाही ना चुकले
त्याच्या नशिबाचे फेरे
घेई वसा अहिल्याचा
रमा, जिजाऊ, सावित्रीचा
समाज कल्याणासाठी
त्यांनी देह झिजवला
सावित्रीची घ्यावी जिद्द
रमाईसारखी सेवा
आई जिजाऊसारखा
मनी साठवुया ठेवा
*शीला पाटील. चांदवड.*