You are currently viewing जागतिक दृष्टीदान दिवस

जागतिक दृष्टीदान दिवस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*जागतिक दृष्टीदान दिवस* 

 

१० जून हा जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून साजरा केला जातो.. हा दिवस जागतिक दृष्टीदान दिवस नसून तो राज्यस्तरीय दृष्टीदान दिवस आहे..

सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस ” दृष्टिदान दिन'” म्हणून साजरा केला जातो… १९८० च्या दशकात महाराष्ट्र सरकारने हा दिवस सुरू केला..

दर वर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा असतो..या राष्ट्रीय स्तरावर कधी कधी साजरा केला जातो. दरवर्षी साजरा केला जातो असे नाही..

डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे.. आज २१ व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेले आहे की एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ते दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही अशा व्यक्तीला सहज देता येतात. त्यामुळे अंध व्यक्तीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. अशा सामाजिक स्वरूपाच्या केलेल्या दानामुळे त्या व्यक्तीच्या मनाला शांती, सुख,

समाधान प्राप्त होते..

डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. ..जागतिक दृष्टीदान दिनाचे उद्दिष्ट नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे..

विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे तर काहींना काही कारणास्तव अंधत्व प्राप्त होते तर काहींना जन्मानंतर अंधत्व प्राप्त होते.

मानवी जीवनात दृष्टीला प्रचंड महत्व आहे. त्यामुळे असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी किंवा दृष्टी आड सृष्टी ह्या म्हणी तयार झाल्या आहेत. माणूस जगातील सृष्टी सौंदर्य आपल्या चक्षू द्वारे अंतःकरणात साठवून ठेवू शकतो. त्यामुळे डोळ्यांना मानवाच्या पंचेद्रियामध्ये मानाचे स्थान आहे.

डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टीसौंदर्य टिपण्याबरोबर मनात स्थान निर्माण करून त्यांची छबी मनाच्या पटलाबरोबर सुंदर चित्राद्वारे इतरांनाही देता येते…

दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळावे यासाठी नेत्रदान किंवा दृष्टीदान प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन मानवास निश्चितचं होऊ शकेल. अर्थात नेत्रदान मरणोत्तर केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोग अंध व्यक्तीस नक्कीच होईल.

मानवाच्या जीवनात डोळेच फक्त मरणोत्तर अंधाना मदत करू शकतात. दृष्टी दानामुळे एक माणूस दुसऱ्या अंध माणसाचे जीवन प्रकाशमय करू शकतो नाही का.. !! जर दृष्टीच नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहू शकणार नाही यांपासून ते कायमचं वंचित राहतील…त्यामुळे जगाचे सौंदर्य त्यातला आनंद ते पाहूच शकत नाहीत.. शकणार नाहीत.

सौंदर्याने भरलेली सृष्टी पाहता येत नाही या सृष्टीसौंदर्याला मुकतात त्या सौंदर्यापासून वंचित राहतात अश्या या व्यक्तींना नेत्र मिळाले तर ते सृष्टीचा आस्वाद आनंद नक्कीच घेऊ शकतील नाही का ? “माणुसकी” या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल असे मला मनापासून वाटते..

नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे @

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा