You are currently viewing शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुखपदी दीपक पाटकर यांची नियुक्ती

शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुखपदी दीपक पाटकर यांची नियुक्ती

शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुखपदी दीपक पाटकर यांची नियुक्ती

मालवण शहरात आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांना अभिप्रेत संघटना उभारणार : दीपक पाटकर

मालवण

मालवण नगरपालिकेचे  माजी नगरसेवक दीपक गणपत पाटकर यांची शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पाटकर यांचा मालवण शहरातील प्रत्येक प्रभागात असलेला दांडगा लोकसंपर्क विचारात घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली. या नियुक्ती बद्दल दीपक पाटकर यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा