कुडाळ :
उमेश गाळवणकर मित्र मंडळ व डॉक्टर संजय निगुडकर यांच्या मित्र परिवारातर्फे उद्या दिनांक १० जून २०२५ रोजी कुडाळ येथील गवळदेव येथे सकाळी १० वाजता प्रतिवर्षाप्रमाणे पुरुषांची वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. गेली १५ वर्ष हे व्रत अविरतपणे चालू ठेवलेले आहे.
पुरुषांच्या बरोबरीने पडद्यामागे राहून त्याला अहोरात्र साथ देणाऱ्या पत्नीप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी व जन्मोजन्मी हीच पत्नी आपणास मिळावी. तिची साथ लाभावी अशा प्रकारचा श्रद्धा भाव, प्रार्थना व्यक्त करण्याच्या उद्देशाने कुडाळ गवळदेव येथे सकाळी १० वाजता पुरुषांच्या वटपौर्णिमेच आयोजन करण्यात आलेल आहे.
तरी इच्छुकानी सदर सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहावे .असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.