You are currently viewing ‘फ्लॉवर व्हॅली ऍट कावळेसाद पॉईंट’ उपक्रमातून वृक्षारोपण

‘फ्लॉवर व्हॅली ऍट कावळेसाद पॉईंट’ उपक्रमातून वृक्षारोपण

येत्या दोन वर्षात कावळेसाद पॉईंट रंगीबेरंगी झाडा फुलांनी बहरणार; संदीप गावडे

संदीप गावडे यांच्या संकल्पनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांकडून कौतुक

सावंतवाडी :

राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पर्यावरण दिना निमित्ताने “एक झाड मातृभूमीसाठी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदिप गावडे यांच्या आयोजनातून रविवारी “फ्लॉवर व्हॅली ऍट कावळेसाद पॉईंट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत गेळे, येथे कावळेसाद पॉइंट तसेच तेथे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १०० झाडे लावण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी भाजपच्या महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, रविंद्र मडगावकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी नगरसेवक मनोज नाईक आदींसह पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, भारतीत्य जनता पार्टीचे सावंतवाडी तालुक्यातील कार्यकर्ते, आंबोली, गेळे, चौकुळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी श्री गावडे म्हणाले, या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या नेहमी गजबजणाऱ्या कावळेसादची एक वेगळी ओळख निर्माण होईल यासाठी आम्ही पॉवर व्हॅली पॉईंट हा उपक्रम राबवला आहे तसेच येथे लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनाची आणि देखभालीची जबाबदारी देखील आम्ही घेणार आहोत. हा कार्यक्रम भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून “एक झाड मातृभूमीसाठी” या उपक्रमांतर्गत राबवण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात कावळेसाद पॉईंट हा रंगीबेरंगी झाडा फुलांनी बहरलेला दिसेल त्यामुळे पर्यटन दृष्ट्या त्याचे आणखीन महत्त्व वाढणार आहे. या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या भागाचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, संदीप प्रत्येक कार्यक्रम नावीन्यपूर्ण राबवत असतो. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर खरोखर तत्परतेने कार्यक्रम राबवून तो पूर्णत्वास घेऊन जाणे ही त्याची खासियत आहे. आजचा कार्यक्रम हे सुद्धा त्याचेच एक उदाहरण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथने याचे उदाहरण घेऊन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा