You are currently viewing शासकीय वसतिगृह योजनेचे अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 10 जून अंतिम मुदत

शासकीय वसतिगृह योजनेचे अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 10 जून अंतिम मुदत

शासकीय वसतिगृह योजनेचे अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 10 जून अंतिम मुदत

सिंधुदुर्गनगरी

 सामाजिक न्याय विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृहांची प्रवेश-प्रक्रिया सन 2024-25 पासून https://hmas.mahait.org  या ऑनलाईन पोर्टलवरती सुरू करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टलव्दारे स्वीकारण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थी यांनी Revert Back केलेले अर्ज अजून फेरसादर केले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अर्जातील त्रृटींची पूर्तता करण्यासाठी दि. 10 जून 2025 अंतिम मुदत देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी  प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला असे एकूण ०३ तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी ,वेंगुर्ला व देवगड असे ०५ एकूण ०८ शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनींना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे.

तरी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी ११ जून २०२५ पासून ऑनलाईन वसतिगृह प्रवेश प्रक्रीया सुरु होईल.

तरी गरजू विद्यार्थ्यांनी  इ. ०८ ते १० वी इ. १० वी नंतरच्या अभ्यासक्रम व बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम / एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे.

शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुक्यास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा (०२३६२ २२८८८२) दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा