You are currently viewing कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्षपदी अतुल बंगे यांची निवड..

कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्षपदी अतुल बंगे यांची निवड..

तर सचिवपदी शरद पावसकर, खजिनदारपदी संदीप साळसकर

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची जनरल सभा भंडारी समाजाचे जेष्ठ नेते वासुदेव पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.

कुडाळ तालुका भंडारी समाजाचा वाद गेली बरीच वर्षे धर्मादाय आयुक्त ओरोस न्यायालयात सुरू होता. न्यायालयाच्या आदेशानुसार ही सभा लक्ष्मण केळुसकर यांनी निमंत्रित करून त्यांच्या निवासस्थानी श्री पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी अध्यक्ष अतुल बंगे, उपाध्यक्ष श्री प्रमोद चिंदरकर, सचिव शरद पावसकर, सहसचिव विठ्ठल कांबळी, खजिनदार संदीप साळसकर, सदस्य संतोष चिपकर, गजानन वेंगुर्लेकर, मनोहर आरोलकर, प्रभाकर साळगावकर, विनोद मयेकर, गुरुनाथ सरमळकर, दीलीप तुळसकर, लक्ष्मण केळुसकर, सुभाष सारंग, चंद्रकांत सारंग, सल्लागार – एकनाथ टेमकर, श्री मोहन तांडेल अशा प्रकारची कार्यकारिणी निवडण्यात आली. भंडारी समाजाचे जेष्ठ नेते माजी अध्यक्ष श्री मामा माड्ये यांनी मार्गदर्शन केले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी राजु गवंडे, राजन कोरगावकर, समील जळवी, लक्ष्मण मोरजकर, मंगेश बांदेकर, अनंत वाड्येकर, दर्शन कुडव, विलास पावसकर आदी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला भंडारी समाजातील देवाज्ञा झालेल्या व्यक्तींना शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा