You are currently viewing नेरूर येथे आढळला दुर्मीळ ॲटलंस माॅथ पतंग   

नेरूर येथे आढळला दुर्मीळ ॲटलंस माॅथ पतंग  

नेरूर येथे आढळला दुर्मीळ ॲटलंस माॅथ पतंग

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे ॲटलंस माॅथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भला मोठा पतंग आढळून आला. आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुरनिड पतंग आहे. हा पतंग 12 इंच एवढा मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे. या पतंगाचे आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. हा पतंग दक्षिण भारत व श्रीलंकेत आढळून येतो. मात्र हा पतंग कुडाळ नेरूर गावात आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा