कुडाळ :
जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवस जगभरात आज साजरा होत आहे. पर्यावरणीय कृती, शाश्वत उत्पादन आणि वापर, समुद्र आणि महासागरांचे संरक्षण आणि परिसंस्था दुरुस्त करणे आणि जैवविविधता टिकवून ठेवणे यासह शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता करणे हे एक महत्त्वाचे योगदान आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज कुडाळ वनपरिक्षेत्रातील मठ वनपरिमंडळ मध्ये वन कक्ष क्रमांक १३६ मध्ये “सुरंगी रोपवन लागवड शुभारंभ” करणेत आला. मा.श्री. नवकिशोर रेड्डी, उप वनसंरक्षक ,वनविभाग सावंतवाडी , मा.श्री.रुपाली नाईक,सरपंच ग्रामपंचायत मठ, मा.श्रीम. धनश्री पाटील,प्राध्यापक ,डॉक्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज,वेंगुर्ला , यांचे शुभ हस्ते सुरंगी रोप लागवड करणेत आली. यावेळी मा.श्री.सुनील लाड सहायक वनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री. संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ, श्री.सावळा कांबळे, वनपाल मठ, श्री.सुर्यकांत सावंत ,वनरक्षक मठ, वनपरिक्षेत्र कुडाळ मधील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर स्टाफ यांनी सुरंगी रोप लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तसेच सदर कार्यक्रमास संयुक्त वनव्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी मा.श्री. नवकिशोर रेड्डी, उप वनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी, मा.श्री. संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी सुरंगी झाडाचे पर्यावरणीय महत्व विषद करून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे आवाहन करण्यात आले.