You are currently viewing नेरुर येथे ८ जून रोजी मोफत आयुर्वेद महाआरोग्य शिबिर

नेरुर येथे ८ जून रोजी मोफत आयुर्वेद महाआरोग्य शिबिर

कुडाळ :

केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ, गोवा तसेच कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्याल यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 08 जून 2025 रोजी कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर येथे सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत मोफत आयुर्वेदिक उपचारांचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने घ्यावा .असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर व बॅ.नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट च्या अध्यक्षा श्रीम. अदिती पै यांनी केले आहे .
*तज्ज्ञ डॉक्टर* या शिबिरासाठी डॉक्टर सुजाता कदम ,डॉक्टर प्रशांत ससाने, डॉक्टर प्रवीण भट ,डॉक्टर विनायक चकोर ,डॉक्टर अंकिता मसुरकर या तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी केली जाणार आहे.

विविध तपासण्या: या मोफत आयुर्वेदिक महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, एलर्जी, अस्थमा, त्वचा विकार, पचनाच्या समस्या, हाडांचे व सांध्यांचे आजार, किडनी विकार, पक्षाघात, वात विकार, मलावरोध, मूळव्याध, भगंदर, बालरोग, स्त्रीरोग, अन्य जुनाट विकार, थायरॉईड, नेत्र तपासणी इत्यादी आजारांवर अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

मोफत औषधोपचार : सदर तपासणी दरम्यान विविध आजारावरील औषधे व गोळ्या मोफत दिले जाणार आहेत ;तसेच आवश्यकता भासल्यास एक्स रे व इसीजी केले जाणार आहेत.
गरजू रुग्णांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळावा या दृष्टीने कवठी, वालावल, चेंदवण ,नेरूर, पाट, हुमरमळा, आंदुर्ले, गोवेरी, पिंगुळी या गावांमध्ये नर्सींग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां मार्फत तसेच आशाताईंच्या माध्यमातून शिबिराची माहिती देण्यात आली आहे.

तरी रुग्णांनी डॉ. सायली गावडे मोब नं 9404919021, प्रा. वैशाली ओटवणेकर 9881886606, प्रा. शंकर माधव 9284508373, प्रा. प्रथमेश हरमलकर 8010273926, अक्षया सामंत 9765925409 यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा