You are currently viewing गेल्या ६ वर्षात पेट्रोल डिझेल दर ३० टक्क्यांनी कडाडले

गेल्या ६ वर्षात पेट्रोल डिझेल दर ३० टक्क्यांनी कडाडले

केंद्र सरकार दरदिवशी इंधन दरवाढ करून पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना जबर दणका देत आहे़ .२८जानेवारी रोजी सलग दुस-या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी २५ पैसे वाढ झाली. या दरवाढीने पेट्रोल विक्रमी पातळीवर आहे. तर डिझेलदेखील उच्चांकी स्तराच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबईत पेट्रोल ९३ रुपयांच्या उंबरठयावर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोलने ८६ चा टप्पा ओलांडला आहे. यावरून भाजप सरकारने सहा वर्षांत ३० टक्क्याने इंधनदरात वाढ केली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे़

भाजप सरकारने गेल्या सहा वर्षांत पेट्रोलवर एक्साइज शुल्कात २३.७८ रुपये प्रती लीटर तर डिझेलवर २८.३७ रुपये प्रती लीटरची वाढ केली. म्हणजेच, पेट्रोलच्या एक्साइज शुल्कात २५८ टक्क्यांनी तर डिझेलच्या एक्साइज शुल्कात ८२० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. ज्यातून गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या एक्साइज शुल्कातून जवळपास २० लाख कोटी रुपये कमावलेत, असा गंभीर आरोप कॉंग्रेसने रविवारी केला होता. सोशल मीडियावर देखील नेटिझन्सकडून भाजप नेत्यांचे जुने व्हिडीओ पोस्ट करून टीका करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आगामी काळात महागाई गगणाला भिडणार असल्याचे संकेत मिळाले आहे़.

दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे.

 

नागरिकांत संतापाची लाट

बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८६ रुपये आहे. एक लीटर डिझेलसाठी मुंबईतील ग्राहकांना ८३.३० रुपये मोजावे लागतील. प्रजासत्ताकदिनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली होती. या दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांनी आपल्या तुंबड्या भरायला लावल्या असून केंद्र सरकार ढीम्म असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

जागतिक बाजाराचे कारण केले समोर

जागतिक बाजारातील महागाईचे कारण पुढे करून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. २०२१ च्या पहिल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये नऊ वेळा दरवाढ झाली आहे. यात पेट्रोल आणि डिझेल सरासरी २.२५ रुपयांनी महागले आहे. आज जागतिक बाजारात क्रूड ऑइलचा भाव ५२.५१ डॉलर प्रती बॅरल आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ५५.५७ डॉलर आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + four =