नगराध्यक्षांच्या पुढाकारातून पालिकेची मोहीम; कोल्हापूर येथील संस्थेला काम
कणकवली
शहरात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकारातून
नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व अँटी रॅबीज लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ५६७ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.तसेच त्यांचे अँटी रॅबीज लसीकरण करण्यात आले.दरम्यान हे काम कोल्हापूर येथील संस्थेला देण्यात आले आहे.
संबंधित संस्थेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात भटके कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येते. दरम्यान सुरुवातीच्या टप्प्यात कुत्रे पकडण्याचे काम गतीने झाले होते.मात्र आता या एजन्सीची गाडी व कर्मचारी कुत्रे पकडण्यासाठी दाखल होताच भटक्या कुत्र्यांची सगळीकडे सैरावैरा धावपळ सुरू होते.मात्र गेले काही दिवस सातत्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.