*मालवण येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळा*
वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांच्यासाठी दिनांक ६ जून रोजी सकाळी ठिक १० वा. संस्कार सभागृह बोर्डिंग ग्राऊंड धुरीवाडा मालवण येथे जिल्हास्तरीय एक दिवशीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा
संस्थेचे राज्य सचिव श्री.अरुण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.
या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून मालवणच्या तहसीलदार श्रीम. वर्षा झालटे तर प्रमुख उपस्थितीमध्ये
राज्य संघटक श्री. सर्जेराव जाधव, राज्य सहसचिव प्रा.एस.एन. पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे माजी सदस्य श्री.कमलाकांत कुबल तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रविण कोल्हे, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.उमेश नेरुरकर व मालवणचे ज्येष्ठ डॉ. राहुल
पंतवालावलकर लाभले आहेत.
या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेमध्ये
सातबारा वाचन-श्री.सर्जेराव जाधव, ग्राहक पंचायतची रचना आणि कार्यपद्धती- प्रा.एस.एन. पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यपध्दती-
श्री.कमलाकांत कुबल व श्रीम.वफा खान, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार- श्री.सिताराम कुडतरकर, सजग विद्यार्थी ग्राहक अभियान- श्रीम.श्रध्दा कदम व ग्राहक देवो भव: -श्री.नितीन वाळके आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र- जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या एकदिवसीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते तसेच या ग्राहक चळवळीची आवड असणाऱ्यांरी उपस्थित राहून प्रबोधन कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शाखा अध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील आणि मालवण तालुका शाखा अध्यक्ष श्री.श्रीकांत वेंगुर्लेकर यांनी केले आहे.