अमरावती दि. 4 यावर्षी आयएएस झालेल्या व विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राठी नगर समोरील अभियंता भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सत्कारामध्ये नागरिकांनी तसेच संस्थांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे यासाठी डॉ पंजाबराव देशमुख आयएस अकादमी व युवा संवाद प्रतिष्ठानने लोकांना तसेच विविध संस्थांना या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे आवाहन केले आहे. ज्या संस्थांना किंवा व्यक्तींना या आयएएस झालेल्या मुला मुलींचे सत्कार करावयाचे असतील त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे विनंती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एड. गजानन फुंडकर संयोजक प्रा. डॉ.नरेश काठोळे सह संयोजक श्री नितीन पवित्रकार व श्री रुपेश राठी यांनी एका पत्रका पत्रकामध्ये केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करण्यात आले असून नागरिकांनी व शैक्षणिक संस्थांनी मोठ्या संख्येने या मुलांचा सत्कार करून महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे वातावरण पोषक करण्यासाठी हातभार लावावा असे संस्थेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रा. डॉ .नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003