You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी सानिया हिचे रायफल शुटिंग स्पर्धेत यश

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी सानिया हिचे रायफल शुटिंग स्पर्धेत यश

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडिअम स्कूल, वेंगुर्ला या शाळेची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी सानिया सुदेश आंगचेकर हिने श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल स्पोर्ट्स ट्रस्ट मार्फत दिनांक 30 मार्च 2021 रोजी डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय ओपन साईट रायफल शुटिंग स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग विद्या निकेतनचे उपाध्यक्ष श्री.ईर्शाद शेख,संचालक श्री.प्रशांत नेरूरकर, सेक्रेटरी श्री.दत्तात्रय परुळेकर,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा डिसोझा,क्रीडा शिक्षक श्री.हेमंत गावडे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तिला यासाठी नेमबाज प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 20 =