काजू बागेस आग लागून ६० हजारांचे नुकसान

काजू बागेस आग लागून ६० हजारांचे नुकसान

मालवण

पळसंब वरची वाडी येथे काजू बागेस आग लागुन साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याने नवीन लागवड केलेली सुमारे दीडशे काजू झाडे आगीत जळाली आहेत. शुक्रवारी सकाळी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, तलाठी अरकराव, कोतवाल श्री. पोयरेकर यानी पाहणी करत नुकसानीची पंच यादी घातली. यावेळी नुकसान ग्रस्त शेतकरी रामा साईल, लक्ष्मण साईल, दिनेश साईल,   पुरुषोत्तम साईल, शशिकांत साईल, गोपाळ साईल,  महिला उपस्थित होत्या. सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सबंधीत शेतकऱ्याना लवकरात लवकर शेत विहिर मंजूरी साठी प्रयत्न करण्यात येतील असे यावेळी सरपंच श्री.गोलतकर यानी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा