शिवराज्याभिषेकानिमित्त अमरावती येथे यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
अमरावती
यावर्षीच्या निकालामध्ये आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येत्या सहा जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या शेगाव नाका चौकातील अभियंता भवन मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. लेडी गव्हर्नर व सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान झालेले श्री भूषण गवई यांच्या मातोश्री प्राचार्य डॉ. कमलताई गवई ह्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल पोलीस महानिरीक्षक श्री रामदास पोकळे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्र तसेच अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद व मुद्रांक जिल्हाधिकारी श्री अनिल औतकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण झालेले कुमारी अदीबा अनम यवतमाळ श्री रजत पत्रे धामणगाव रेल्वे डॉ. जयकुमार आडे यवतमाळ कुमारी नम्रता ठाकरे वरूड कुमारी मोहिनी प्रल्हाद खंडारे बुलढाणा डॉ कु. अश्विनी धामणकर मंगरूळपीर श्री अभय देशमुख यवतमाळ डॉ. पंकज पटले गोंदिया यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात हे सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकॅडमीच्या मिशन आयएएस व युवा संवाद प्रतिष्ठान यांच्या वतीने संयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व श्री नितीन पवित्रकार यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सत्काराला व स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती मिशन आय ए एस.चे अध्यक्ष श्री डी व्ही मोडक कार्याध्यक्ष श्री नरेंद्र बोरकर उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. रा गो चवरे सहसंचालक श्री राजेंद्र इंगोले यांनी एका संयुक्त प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
