You are currently viewing बांदा केंद्र शाळेत आरोग्यदायी व मजेदार समर कॅम्प

बांदा केंद्र शाळेत आरोग्यदायी व मजेदार समर कॅम्प

*बांदा केंद्र शाळेत आरोग्यदायी व मजेदार समर कॅम्प*

बांदा

पोषण आहार व आरोग्यदायी जीवनशैलीच्या संदर्भात इट राईट समर कॅम्प २०२५ पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेत बुधवार दि.२८मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कॅम्पमध्ये बांदा परीसरातील शाळांचे ५०विद्यार्थी सहभागी झाले होते.
बांदा गावच्या प्रथम नागरिक अपेक्षा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,बांदा पोलिस स्टेशन निरीक्षक विकास बडवे ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संपदा सिध्दये , सदस्य हेमंत मोर्ये, मुख्याध्यापक शांताराम असनकर,बाल रक्षा भारत संस्थेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी अपर्णा जोशी, उपशिक्षक जे.डी‌.पाटील ,मनिषा खणगावकर, रोहन शारबिद्रे,फ्रेन्सिना रुद्रिक,आकाश‌ मंचेकर, बाबा काणेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून या कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. एक दिवसीय या समर कॅम्प मध्ये पोषण शिक्षण आणि मजेदार खेळ,क्रिएटिव पोस्टर आणि क्राफ्ट,हेल्दी स्नॅक्स एॅक्टीव्हीटी ,टीम गेम्स,पोषण आहार व आरोग्यशैली संदर्भात व्याख्यान इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या समर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व‌ सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी सवयी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या या समर कॅम्प साठी बाल रक्षा भारत संस्था ईट राईट स्कूल प्रकल्पाच्या माध्यमातून व मांडेलिझ या कंपनीच्या अर्थसाहाय्यातून हा समर कॅम्प यशस्वी पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा